Share

“…यश येत नसल्यानेच फडणवीसांची टोकाची भूमिका”- शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या राज्यात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. यातच काल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आता फडणवीस यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील सरकार तपास यंत्रणांचा वापर करूनही अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले.

यावेळी शरद पवार असेही म्हणाले कि, भाजप सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु राज्यातील सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न होत असला तरी हे सरकार ५ वर्ष टिकणार आहे. फडणवीसांनी दिलेल्या रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील आणि एसीपी यांना हाताशी धरून सरकारने षडयंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे. तसेच पुराव्यांखातर फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या आरोपांमध्ये शरद पवार यांच्याही नावाची उल्लेख झाल्याने खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या आरोपांवर प्रतिउत्तर देताना शरद पवार म्हणाले कि, सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डींग होते ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य आहे. अनिल देशमुखांविरोधात ९० छापे टाकण्यात आले आहेत. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी केली जाते, याचं उत्तम उदाहरण देशमुखांचं आहे. आरोपांचा काही भाग मला समजला. या आरोपांमध्ये माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा याच्याशी काही संबंध नसल्याचे, पवार यांनी स्पष्ट केले.

मलिकांचा राजीनामा नाहीच

भाजपकडून होत असलेल्या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवार म्हणाले, नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नाही. मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडाणे हे घृणास्पद आहे, असेही ते म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!