पुणे : राज्यातील महसूल आणि कृषी विभागातील मतभेदामुळे केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ या महत्वाच्या योजनेला अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही योजना केंद्राची आहे, परंतु या योजनेची अंमलबजावणी करणे हे दोन्ही विभागाची जबाबदारी आहे. असे असताना राज्यातील ८ लाख ५३ हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.
११ वा हप्ता जमा होण्याआधी या समस्या दूर करण्याच्या सूचना केंद्राने दिलेल्या आहेत. त्यामुळे या समस्यांचे निराकरण २५ मार्च रोजी होणार असे संगीतले आहे. २५ मार्च ला राज्यभर शिबिरे राबविण्यात येणार आहे, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. हे काम ३१ मार्च पर्यंत महसूल विभागाला पूर्ण करायचे आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ३१ तारखेपर्यंत सुटणार आहेत. ११ वा हप्ता जमा करण्यापूर्वी पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा असे धोरण केंद्राने तयार करण्यात आले आहे. आता स्थानिक पातळीवरील शिबिरात नेमक्या काय अडचणी समोर येतात हे पहावे लागणार असल्याचे सांगितले आहे. पीएम किसान योजनेच्या लाभासंदर्भात २५ मार्च ह्या एकाच दिवशी गावस्तरावर शिबिर घेऊन शेतकऱ्यांकडून कागदपत्रे जमा करुन घेतली जाणार आहेत. अशी माहिती दिलेली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

