मुंबई: क्रिकेटमधील जगातील पहिला कंकशन पर्याय बनण्यापासून ते जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाज बनण्यापर्यंत, मार्नस लाबुशेनने खूप मोठा पल्ला गाठला आहे. एक असा प्रवास ज्याने क्रिकेटरला त्याच्याच पद्धतीने फुलवले. आता जेव्हा जेव्हा एखाद्या क्रिकेट चाहत्याला मार्नसचे नाव विचारण्यात येते, तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर जे काही चित्रे चमकतात त्या विनोदी असतात. ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौरा करत आहे. या दौऱ्यात पाकिस्तानी चाहत्यांनी मार्नस लाबूशेनला त्याच्या नावाचे उच्चारण विचारले आहे.
२४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि मार्नस (Marnus labhuschenge) चाहत्यांचा आवडता बनला आहे. पहिल्या डावात लाबशेनने ९० धावांपर्यंत मजल मारली. त्याचे शतक हुकले पण तो चाहत्यांचा लक्ष बनला. चाहत्यांनी त्यांच्यासाठी मैदानावर अनेक प्ले कार्ड आणले होते. सामना संपल्यानंतर मार्नसने काही सर्वात अनोखे शैलीतील प्लेकार्ड शेअर केले आहे. ज्याच्या खाली त्याने लिहले “रावळपिंडी मधील प्रेक्षकांच्या हातात हे प्लेकार्ड बघून भारी वाटले”
https://www.instagram.com/p/Ca08xn2vaYJ/?utm_source=ig_web_copy_link
पाकिस्तानचे सलामीवीर इमाम-उल-हक आणि शफीक यांनी शेवटच्या दिवशी खेळावर वर्चस्व राखले आणि वैयक्तिक शतके ठोकल्याने सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “व्हिडिओ सत्यता पडताळून कारवाई करणार”, फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
- २१ वर्षीय भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या सैन्यात झाला भरती
- “या” भागात पाऊस होण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा!
- MCC ने जाहीर केली नवीन नियमांची यादी; मोठे बदल १ ऑक्टोबरपासून लागू होणार
- “साहेब गाडी चालवत विधान भवनात आले अन्…”, सदाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना टोला


