Share

Sandipan Bhumre : मागील अडीच वर्षात मतदासंघांतील विकास रखडला – संदीपान भुमरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्रातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत ३९ आमदारांनी बंड पुकारले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एक प्रकारे राजकीय भूकंप आला. या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर दोन दिवसांनी एकनाथ शिंदे गटाने व भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. या नव्या सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काल विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारने घेतलेल्या काही निर्णयांचाही फेरविचार केला जाईल असेही म्हटले आहे.

दरम्यान शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भुमरे हे पहिल्यांदाच औरंगाबादेत जनतेमध्ये गेले. त्यानिमित्ताने मुकुंदवाडी येथे आले असता कार्यकर्त्यांकडून त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व गुलाल उधळून जल्लोष केला. ‘मागील अडीच वर्षात पैठण विधानसभा मतदारसंघातील काही कामे रखडली आहेत. ती आता जलद गतीने पूर्ण केली जातील.’ असे यावेळी बोलताना भुमरे म्हणाले.

‘शिवसेनेत बंड करण्याच्या या निर्णयात कार्यकर्ते माझ्या सोबत ठामपणे उभे राहिले, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात पैठण विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. मागील अडीच वर्षात मतदारसंघातील अनेक महत्वाची कामे रखडली आहेत. नव्या सरकारच्या स्थापनेमुळे ती आता जलद गतीने पूर्ण केली जातील. ‘ असे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच त्यांनी विलासबापू प्रतिष्ठानचे शेखर म्हस्के व इतर कार्यकर्त्यांचे आभार मानले.

भुमरे यांनी त्यांच्या बंडामागचे कारण अनेक वेळा स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी आमचा संवाद होऊ दिला जात नव्हता अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आम्ही फोन लावायचो पण त्यांना तो फोन दिला जात नव्हता. उद्धव साहेबांना चार जणांच्या विळख्याबाहेर जाऊन देत नव्हते, असेही भुमरेंनी अनेकवेळा म्हटले आहे. मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये संदिपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली गेली होती. त्यामुळे आता नवीन सरकार मध्ये भुमरे यांना कोणत्या पदाची जबाबदारी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!