Share

Shahajibapu Patil | “हा बाबा पहाटेच मंत्रालयात येऊन…”; शहाजीबापूंचा अजित पवारांवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

जळगाव :  सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आगामी निवडणुकांचं वारंही सगळीकडे घुमू लागलं असून, सर्व पक्ष निडवणुकांच्या तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. हे जरी असलं तरी, विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेते एकमेकांवर आरोप करायचे काही थांबत नाहीत. अशातच शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शहाजीबापू पाटील ?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेगवेगळ्या कारणांसाठी ‘मातोश्री’वर थांबायचे आणि तो अजित पवार पहाटेच मंत्रालयात येऊन बसायचा, असा ऐकेरी उल्लेख करत शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. शहाजीबापू यांनी जळगाव येथे सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. अकरा वाजता मंत्रालय उघडायचं आणि हा बाबा सकाळी साडे सातलाच मंत्रालयात येऊन बसायचा.

आम्हाला गिळल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही-

महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष होतं. परंतू या काळात राष्ट्रवादीने सगळा निधी नेला, त्यांनी सगळी कामं नेली, सगळ्या योजना नेल्या. आम्ही मात्र मुख्यमंत्र्यांचे आमदार म्हणून मंत्रालयाच्या परिसरात तोंड बारीक करून हिंडत बसायचो. आपल्याला राष्ट्रवादीनं निम्मं गिळलं आहे, बाकीचं गिळल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही. त्यामुळे आम्ही 50 आमदारांनी मिळून एकनाथ शिंदेना सांगितलं, काहीतरी निर्णय घ्या. अन्यथा येणारी विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक एवढी सोपी राहणार नाही.

शाळेतली पोरंसुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात नाही-

तसेच, 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन होणार होतं. मात्र अचानक आम्हाला सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं. तिथे एक आठवडाभर आम्हाला ठेवलं. तेथून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेलं तिथेही आठवडाभर ठेवलं. मग तिसऱ्या हॉटेलमध्ये नेलं. शाळेतली पोरंसुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात नसल्याचं शहाजीबापू यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!