Share

Shivsena Vs Shinde: दादर राड्याप्रकरणी जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक, उद्धव ठाकरे म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना गटामध्ये राडा झाला होता.या राड्याप्रकरणी शिवसेनेच्या महेश सावंत यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांनी जामीन दिला असून मातोश्रीवर यांचं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक करण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलं शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कौतुकः

महेश सावंत आणि इतर 5 शिवसैनिकांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलंय. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. तसेच यावेळी महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले.

कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर महेश सावंत यांनी दिली आहे. 2 महिन्यांपासून आम्ही पोलिसांना सांगत होतो त्यांना आवरा. त्यांनी आमच्यावर फायरिंग केली. पोलीस जखमी झाला असता. त्यामुळे आम्हाला आमची ताकद दाखवावी लागली, आम्ही शिवसेनेशी निष्ठावंत असल्याचं महेश सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या कौतुक समारंभाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच शिवसैनिकांकडून सदा सावरकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. सावरकरांनी राड्यामध्ये गोळीबार केला असल्याचं शिवसेनाकडून म्हण्यात आलं आहे. मात्र हा आरोप सावरकरांनी फेटाळून लावला आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!