Share

Krushna Hegade | “…म्हणून मी शिंदे गटात प्रवेश केला”, कृष्णा हेगडे यांचं स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

Krushna Hegade | मुंबई : माजी आमदार कृष्णा हेगडे (Krushna Hegade) यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं आहे. अशातच हेगडे यांनी शिंदे गटात का प्रवेश केला यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हेगडे यांना ठाकरे गटातील महत्वाचे नेते मानलं जातं होतं.

यावेळी, मी अजून शिवसेना सोडलेली नाही. दोन वर्षांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मला चार आश्वासनं देण्यात आली होती. मात्र ती पूर्ण झालेली नसल्याचं कृष्णा हेगडे यांनी सांगितलं आहे. तसेच, आमच्या मतदार संघातील काही समस्यांबाबत ही आश्वासनं होती, मी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यांनी मला मोठी जबाबदारीदेखील दिली आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतला असल्याचं हेगडेंनी सांगितलं.

यादरम्यान, शिवसेनेत जाणे ही माझीच चूक होती. सगळेच माझे मित्र आहेत ठाकरे गटात कुणावरही माझी नाराजी नसून 5 लाख लोक राहतात, त्यांच्या पुनर्वसनाचं काम होतं. . विलेपार्लेतील रस्त्याच्या प्रश्न होता तसेच पक्ष संघटनवाढीत भूमिका बजावण्याची माझी इच्छा होती. या प्रमुख अपेक्षा होत्या, असं देखील त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!