मुंबई : राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. अनेक नेत्यांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केलं असून एकमेकांवर टिपा टिपणी देखील केली आहे. अशातच शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपुर्वी मिटकरी यांनी शहाजीबापू बाबत वक्तव्य केलं होतं. अशातच काय ती झाडी, डोंगर, या शैलीत डायलाॅगबाजी करणाऱ्या शहाजीबापूंनी पुन्हा एकदा त्यांच्या वेगळ्या शैलीत अमोल मिटकरींना उत्तर दिलं आहे.
अमोल मिटकरी हे राजकरणातले विचार करण्याचे पात्र नाहीः
अमोल मिटकरी हे राजकरणातले विचार करण्याचे पात्र नाही. आमच्याकडे नाऱ्या म्हणून सोंगड्या आहे, मिटकरी तेच सोंगड्या आहेत. संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे त्यांची जागा आपल्याला मिळावी म्हणून ते रोज टीव्हीवर नेटून- थटून येतात. दाडीला तेल लावतात आणि टिव्हीवर येत आहेत, पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
शहाजी बापू पाटील हे व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे गटातील जॉनी लिव्हर आहेतः
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शहाजी बापू पाटील यांच्यावर टीकेचा बाण सोडला होता. शहाजी बापू हे व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे गटातील जॉनी लिव्हर आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस करूमणूक म्हणूनच पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करू नये. शिंदे गटाने त्यांचा कार्यक्रम कसा वाजवला याची चिंता त्यांनी करावी व स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं, असं मिटकरी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्याः
- Seema Patra | धक्कादायक! भाजप नेत्या सीमा पात्राने पिडीतेला शौचालय चाटायला भाग पाडलं अन् नंतर…
- Sonia Gandhi | धक्कादायक! सोनिया गांधी यांच्या आईने इटलीमध्ये घेतला अखेरचा श्वास
- Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, कोर्टात हजर राहण्याचा आदेश
- Shinde-Fadnavis government | सरकारचा न्यायालयावर देखील ताबा आहे का? हा VIDEO पाहाचं
- Shahijibapu Patil | “मातोश्रीवर सुख, शांती दाबून दे, रश्मी वहिनींना…” शहाजीबापू पाटीलांची गणपती चरणी आश्चर्यजनक प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

