मुंबई : राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. अनेक नेत्यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं असून त्यांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशातच शहाजीबापू पाटील यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे. यावेळी पाटलांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ईश्वर चरणी साकड घातल आहे.
शहाजीबापू पाटील यांनी गणपती चरणी केली प्रार्थनाः
शहाजीबापू पाटील यांनी गणपती बसवल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधत त्यांनी मातोश्रीच्या दारात सुख, शांती दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना गणरायांकडे केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यादरम्यान, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे. पीकपाणी जोरात होऊ दे, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये असलेले शहाजी बापू पाटील यांचा एक डायलाॅग बंड वेळी प्रचंड प्रसिद्ध झाला. काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हाटेल, असा पाटील यांचा डायलाॅग होता.
महत्वाच्या बातम्याः
- Narayan Rane | “ट्विव ट्विव करत उंदीर महाराष्ट्रभर फिरत आहे” ; नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
- Narayan Rane | उद्धव ठाकरे हे कंत्राटी मुख्यमंत्री होते ; नारायण राणेंचा घणाघात
- Amol Mitakari | “शिंदे गटातील अनेक आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात” ; अमोल मिटकरींचे विधान
- BDD चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे
- AKOLA | बाप्पाचं आज आमदार अमोल मिटकरींच्या घरी आगमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

