Share

Sonia Gandhi | धक्कादायक! सोनिया गांधी यांच्या आईने इटलीमध्ये घेतला अखेरचा श्वास

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर मोठं दुखाःचा डोंगर कोसळला आहे. सोनिया गांधींच्या आईचं निधन झालं असल्याची धक्कादायाक बातमी समोर आली आहे. यामुळे केवळ गांधींनाच नव्हे तर पुर्ण काँग्रेसवरच शोकाकुळ पसरला आहे.

सोनिया गांधी यांच्या आईचं निधनः

इटलीमध्ये सोनिया गांधी यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला आहे. सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो यांचं शनिवारी 27 ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. म्हणजेच 30 तारखेला पाओला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

इटलीमध्ये घेतला अखेरचा श्वासः

इटली मधल्या त्यांच्या राहत्या घरी पाओला माईनो यांनी अखेरचा श्वास घेतला. सोनिया गांधी यांच्या आई मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या आणि राहुल गांधी देखील बरेच दिवस त्यांच्या उपचारासाठी इटलीमध्ये जात होते. मात्र मागच्या आठवड्यामध्ये सोन्या गांधी या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सोबत आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या.

दरम्यान, मागच्या काही वर्षांमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अनेक वेळा इटलीमध्ये गेले होते. 2020 साली राहुल गांधींच्या वारंवारच्या प्रदेश दौऱ्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. तेव्हा सुद्धा काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली होती. यावेळी राहुल गांधी इटलीला त्यांच्या आजारी आजीला भेटायला जात असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!