Share

शाहरुखच्या संघाला नमवण्यासाठी शाहरुख मैदानात; आयपीएलमध्ये आज पंजाब आणि कोलकाता आमने-सामने

Published On: 

अहमदाबाद : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स संघात अहमदाबाद येथे सामना होणार आहे. कोरोनामुळे काही शहरातच आयपीएलचे सामने होत आहेत. रविवारी चेन्नई आणि मुंबई येथील शेवटचे सामने झाले आहे. २६ एप्रिलपासुन पुढील सामने हे अहमदाबाद आणि दिल्ली येथे होणार आहेत. आजच्या सामन्यात गुणतालीकेत सर्वात खाली असलेला कोलकाता नाइट रायडर्स संघ विजयाच्या मार्गावर परतण्यास उत्सुक असेल, तर पंजाबचा संघ विजयी मालिका सुरु ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. हा सामना आणखी विशेश आहे कारण पंजाब किंग्स संघाचा खेळाडू असलेला शाहरुख खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आयपीएलचा संघ केकेआरच्या विरोधात सामना खेळणार त्यामुळे हा सामना शाहरुख विरुद्ध शाहरुख असा म्हणता येईल.

गुणतालीकेत पाचव्या स्थानी असलेल्या पंजाब संघाने सलामीचा सामना जिंकल्यानंतर सलग तीन पराभवाचे तोंड बघीतले होते. मात्र मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यांनी शानदार विजय मिळवत विजयाच्या मार्गावर परतले. पंजाब संघाची फलंदाजी ही सलामीवीर के एल राहुल , मंयक आग्रवाल आणि ख्रिस गेल यांच्यावर अंवलबुन आहे. मधल्या फळीतील शाहरुख खानने विशेष चमक दाखवली नाही. मागील सामन्यात बिश्नोईने चांगली गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्याकडून आज विशेष कामगीरीची अपेक्षा आहे.

तर दुसरीकडे सलामीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर केकेआरने सलग चार सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यात चेन्नई विरुद्धच्या सामन्यातील दिलेली झुंज सोडली तर स्पर्धेत केकेआरचा संघ अपयशी ठरला आहे. सलामीवीर नितीश राणा आणि शुभमन गील अवश्यक सुरुवात करुन देत आहे. मात्र मधल्या फळीतील राहुल त्रिपाठी वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरत आहे. कर्णाधार मॉर्गनही स्पर्धेत विशेष चमक दाखवु शकला नाही. तर गोलंदाजीत समिंश्र कामगीरी राहिली आहे. आहमदाबादच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यातील के एल राहुलची कामगीरी पाहता केकेआरचा संघ आज विजय मिळवण्यास उत्सुक असेल तर, के एल राहुल या मैदानावरील अपयशाची मालिका खंडीत करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!