मुंबई – गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना ई-पास सक्तीचा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी शासनाने ई-पास सक्तीचा केला आहे. सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर याची कडक अंमलबजावणी सुरु आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे इतर रस्ते देखील बंद करण्यात आले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजपासून ई-पास नसलेल्या वाहनधारकांना सीमेवर थांबवण्यात येत आहे. पास असलेल्या वाहनचालकाना प्रवेश देण्यात येत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्यावर थांबवण्यात येत आहे.यामधून अत्यावश्यक सेवेची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात कालही नव्या कोरोना बाधितांच्या संख्येने 66 हजारांचा टप्पा पार केला. काल कोरोनाच्या 66 हजार 191 नवीन रूग्णांचे निदान झाले. राज्यात काल 61 हजार 450 कोरोनाचे रूग्ण बरे झाले. त्यामुळे राज्याचा रूग्ण बरे होण्याचा दर 82 .29 टक्के झाला आहे.
सध्या 6 लाख 98 हजारहून अधिक कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. कोविड19 मुळे राज्यात काल 832 रूग्णांचा मृत्यू झाला, राज्यातला मृत्युदर 1 .51 टक्के आहे. राज्यात चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण 16.68 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
- ‘…तर भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल’; चंद्रकांतदादांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ‘पवारांचे बस्तान बसविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून सोलापूर जिल्ह्याचा दिला जातोय बळी’
- मलिक, राऊत आणि आव्हाड महाराष्ट्राच्या जनतेची आणि मोदींची माफी मागतील का?


