Share

शाहरुख आणि अक्षय ‘या’ कारणामुळे करू शकत नाही एकत्र काम

Published On: 

मुंबई: बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान अनेकांचा लोकप्रिय अभिनेता आहे. तसेचबॉलीवुडचा खिलाडि कुमर अर्थात अक्षय कुमारचा फॅन देखील जबरदस्त आहे. या दोघांच्या चाहत्या वर्गाला यांना एकत्र पाहण्याची इच्छा असली तरी ती आता पूर्ण होऊ शकणार नाही. याबाबत खुद्द शाहरुखने खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत शाहरुखनं अक्षय कुमारसोबत काम न करण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, ‘अक्षय खूपच शिस्तप्रिय अभिनेता आहे. तो खूप लवकर उठतो आणि मी उशीरा उठतो. माझा दिवस जेव्हा सुरु होतो तेव्हा अक्षय झोपण्याची तयारी करत असतो. आमच्या जगण्याच्या वेळा परस्पर विरुद्ध आहेत. त्यामुळं आमची भेट कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही कधी एकत्र काम करु असं वाटत नाही.’

अक्षय आणि शाहरुखनं 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात अक्षयनं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुफान गाजला होता. मात्र यानंतर अक्षय आणि शाहरुख पुन्हा कधीही एकत्र दिसले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!