🕒 1 min read
पुणे : आगरी किंग म्हणून ओळखला जाणार प्रसिद्ध कॉमेडी किंग युट्युबर विनायक माळी लवकरच मोठ्या पडल्यावर दिसणार आहे. विनायक माळीला त्याच्या खऱ्या नावाने खूप कमी लोक ओळखतात पण दादुस आणि शेठ लोक म्हंटल की लगेच त्याची ओळख पटती दादुस म्हणून ओळखला जाणारा विनायक माळी खूप कमी काळातच अनेकांचा लाडका झाला.
प्रसिद्ध मराठी कॉमेडी किंग युट्युबर विनायक माळी एका मध्यमवर्गीय आगरी कुटुंबात जन्मला आला, त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत, तसेच त्याला एक लहान बहीण सुद्धा आहे. पण वडिलांच्या कामामुळे त्यांना ठाण्याला राहावे लागले. त्याचे शालेय शिक्षण सुद्धा ठाण्यातच पूर्ण झाले. ठाणे जिल्ह्यात तो लहानाचा मोठा झाला. आणि त्याने मुंबई मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. मात्र जॉब करण्यात रस नसणाऱ्या विनायक माळीने सोशल मीडियावर कॉमेडी करायला सुरुवात केली.
मराठीमध्ये कॉमेडी करणाऱ्या चैनल मध्ये सगळ्यात जास्त विनायक माहिती सबस्क्रायबर आहेत आणि तसेच हे चैनल लवकरच वीस लाख सबस्क्रायबर ही कंप्लेट करणार आहे. त्याची प्रसिद्धी आणि त्याची लोकप्रियता एवढे जास्त आहे की अनेक मराठी सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्या चित्रपटाचा प्रमोशन करण्यासाठी विनायक माळी जवळ येतात.
तुमचा लाडका दादुस उर्फ विनायक माळी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आपण चित्रपट करणार असल्याची माहिती त्याने स्वतः दिली आहे. आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर त्याने एक पोस्ट शेअर करत त्याच्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. ‘जी गोष्ट मिळवण्यासाठी मी लहानपणी पासून खूप वाट बघितली ती गोष्ट आज मिळाली, डोन्ट वरी गर्लफ्रेंड नाही ती एक फिल्म आहे. आणि ती लवकरच सिनेमागृहात येईल, जेवढं प्रेम मला Youtube वर दिलं आशा करतो तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम सिनेमागृहात पण मिळेल. अशा आशयाची पोस्ट लिहित त्याने चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- ‘आयपीएल आणि पैशांसाठी सामना रद्द करण्यात आला’; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा गंभीर आरोप
- टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, नाहीतर सक्तीची स्वेच्छानिवृत्ती- नितीन गडकरी
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ‘भारतीय असल्यानं प्रत्येक सण साजरे करणार’; अर्शी खानचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
