मुंबई : सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला हे क्काही वेळापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी संसदेतील शाह यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. आदर पुनावाला आणि अमित शाह यांच्या कोरोना लस निर्मिती आणि पुरवठा यासंदर्भात चर्चा होऊ शकते. अमित शाह आणि आदर पुनावाला यांच्यामध्ये बैठक होणार आहे. आदर पुनावाला यांना सध्या सुरक्षा देण्यात आलेली आहे.
सीरम कडून कोविशील्ड लस बनवण्यात येत आहे. तर, सीरमकडून इतर लसी देखील पुढील काही काळात तयार केल्या जातील. सीरम येत्या काही दिवसांमध्ये लहान मुलांसाठीची लस तयार करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नवी दिल्ली येथे अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत. दरम्यान आज सकाळीच त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचिऊ देखील भेट घेतली आहे.
या दरम्यान, कोविशील्ड लसीबद्दल दोघांमध्ये संभाषण झाले. संभाषणानंतर अदार पूनावाला म्हणाले की, आमच्यामध्ये लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी चर्चा झाली. त्यांनी सांगितले कीरोपमधील 17 पेक्षा जास्त देशांनी आधीच कोविशील्डला मान्यता दिली आहे, तर अनेक देश लवकरच कोविशील्ड लस मंजूर करू शकतात.’ असे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करा’, खा.गौतमची ‘गंभीर’ मागणी
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

