Share

Wimbledon : दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत गारद; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि सर्वात जुन्या टेनिस स्पर्धेत चाहत्यांच्या वाट्याला निराशा आली. जगातील अव्वल क्रमांकाची टेनिसपटू सेरेना विल्यम्स विम्बल्डन ओपनमधील पहिला सामना गमावल्याने स्पर्धेतून बाहेर पडली आहे. विम्बल्डन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळला जाणारा हा सामना गेल्या वर्षभरातील सेरेनाचा पहिला सामना होता. तिने ३६४ दिवसांनंतर महिला एकेरीच्या सामन्यात पुनरागमन केले होते.

या सामन्यादरम्यान सेरेनाच्या खेळातही बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान सेरेना पूर्णपणे लयाबाहेर दिसली. मात्र, काही प्रसंगी तिने चांगला खेळही दाखवला. पण तरीही तिला हा सामना जिंकता आला नाही. या सामन्यात सेरेनाला विम्बल्डनमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत ११५व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या हार्मोनी टेनने सेरेनाचा ७-५, १-६, ७-६ (१०-७) असा पराभव केला.

सेरेना विल्यम्सने सात वेळा विम्बल्डन ट्रॉफीवर कब्जा केला आहे. तिने तिचा शेवटचा एकेरी सामना गेल्या वर्षी २९ जून रोजी विम्बल्डनमध्ये खेळला होता पण पहिल्या सेटमध्येच दुखापतीमुळे ती बाहेर पडली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!