मुंबई : केंद्राने नुकताच एक नॅशनल मॉनिटायझेश प्लॅन जाहीर केला आहे. ज्यामध्ये खाजगी क्षेत्राशी संलग्न होऊन ६ कोटी रुपयांची मालमत्ता भाडेतत्वावर देऊन कमाई केली जाईल. त्यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये केलेली देशातील कमाई भाजप सरकार विकत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. परंतु, ही मालमत्ता विकत नसून फक्त भाडेतत्वावर देणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामधून मिळालेल्या पैशाने देशाचा विकास केला जाईल, असेही केंद्र सरकारने म्हंटले आहे. त्यावर आता काँग्रेसने टीका केली आहे.
यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. त्यातच आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘देशाच्या संपत्तीची विक्री आणि आमदारांची खरेद, इतकंच काय ते अर्थशास्त्र भाजपला कळतं’, असं म्हणत नितीन राऊतांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. याबाबत नितीन राऊत यांनी ट्वीट केलं आहे.
राष्ट्रीय संपत्तीची विक्री आणि आमदारांची खरेदी, इतकंच अर्थशास्त्र भाजपाला कळतं.
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) August 26, 2021
दरम्यान, कोरोनाचा वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. केंद्र सरकार विक्री करण्यात व्यस्त आहे, असं जनतेला आवाहन करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Rising #COVID numbers are worrying. Vaccination must pick up pace to avoid serious outcomes in the next wave.
Please take care of yourselves because GOI is busy with sales.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 26, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कचा वापरही झाला कमी, मास्क विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?’; वरुण सरदेसाईंचा प्रतिसवाल
- ‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

