पुणे – कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याची चर्चा आहे. कारण पुणे शहरात नव्या बाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. पुणे शहरात काल नव्याने तब्बल ३९९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९४ हजार १८५ इतकी झाली आहे. तर शहरातील २१६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८३ हजार २२१ झाली आहे.
दरम्यान, काल एकाच दिवसात ८ हजार ९६१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ८२ हजार ७९३ इतकी झाली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या २ हजार ०६६ रुग्णांपैकी २०८ रुग्ण गंभीर तर २५७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८९८ इतकी झाली आहे.
दरम्यान, पुण्यातील कोरोनाबाधित लोकांची संख्या गेल्या महिनाभरापासून कमी झाल्यानंतर ८ दिवसांपूर्वी निर्बंधही मोठ्या प्रमाणावर हटवण्यात आले . यानंतर पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाविषयक निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून शहराच्या अनेक भागात मास्क न वापरता फिरणारे नागरिक दिसून येत आहेत.
रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी होत असल्याचं चित्र सकाळ सायंकाळ दिसून आलं आहे. एका बाजूला निर्बंध कमी झाल्यानंतर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं असताना मास्कशिवाय फिरणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाच्या काळाच्या तुलनेत मास्क विक्रीचं प्रमाण १० ते १५ टक्क्यांपर्यंत कमी झालं असल्याची माहिती औषध विक्रेते आणि अन्य विक्रेत्यांकडून मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीय पक्षात मतभेद असतात, पण…’; बापटांनी राणेंचे कान टोचले
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?’; वरुण सरदेसाईंचा प्रतिसवाल
- ‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
