Share

संथ खेळीमुळे सेहवागने विलियमसनला केले ट्रोल, शेअर केले ट्विट

Published On: 

मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.

या सामन्यात न्युझीलंडकडून डेवॉन कॉनवेने सर्वाधीक ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खालोखाल कर्णधार केन विलियनसनने ४९ धावांची खेळी केली. मात्र ४९ धावांसाठी त्याने १७७ चेंडु घेतले. या खेळीत विलियमसनने पहिल्या १०० चेंडुत केवळ १५ धावा केल्या होत्या. विलियमसनच्या या संथ खेळीवर भारताचा माजी क्रिकेटपटु विरेंद्र सेहवागने एक ट्विट करत त्याला ट्रोल केले आहे. या ट्विटमध्ये विलियमसनच्या खेळीचे वर्णन करताना झोपलेल्या कुत्र्याचे मीम शेअर केले. आणि कॅप्शनमध्ये ‘आज खेळपट्टीवर विलियमसन असा होता.’ असे लिहीले आहे.

https://twitter.com/virendersehwag/status/1407311665075347458

न्युझीलंडच्या पहिल्या डावात केन विलीयमसनने दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी केली होती. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. मात्र त्याच्या या खेळीमुळे न्युझीलंडचा संघ भारताविरुद्ध ३२ धावांची आघाडी मिळवू शकला. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने २ गडी गमावत ६४ धावांची मजल मारली होती. भारताकडे सध्या ३२ धावांची आघाडी आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!