Share

भाजपचे गंडांतर पाहूनच लोकशाहीच्या संरक्षणासाठी मविआ सरकारची स्थापना-सचिन सावंत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या सर्व आरोपांवर आज शिवसेना उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. तर याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

“लोकशाहीवरील भाजपाचे गंडांतर पाहूनच लोकशाहीच्या संरक्षणासाठी मविआ सरकारची स्थापना झाली. हे सरकार पाडण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणांचा नाझी SS सैन्याप्रमाणे वापर करत आहेत. सरकारच्या बदनामीसाठी मविआ नेत्यांचा भयंकर छळ चालू आहे. याविरोधात देशहितासाठी लढावेच लागेल. ते ही एकजुटीने!”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेची उद्याची पत्रकार परिषद विरोधकांनी, केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी काळजीपूर्वक ऐकावी. उद्याच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र बोलेल. तसेच शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे का, असे जर विरोधी पक्ष बोलत असेल, तर हो शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे. असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!