पुणे : त्रिपुरा घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव येथे पडले आहेत. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम धर्मियांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर शनिवारी अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. अमरावतीमध्ये बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर हिंसाचाराला चिथावणी देणार्या अफवा पसरू नये म्हणून पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली आहे.
त्रिपुरा घटनेच्या या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदीचा आदेश (144 कलम) लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी आजपासून (ता. 14 नोव्हेंबर) लागू करण्यात आली असून ती पुढील 7 दिवस म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच्या 12 पर्यंत असणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात आजपासून पुढील सात दिवस जमावबंदी असणार आहे. त्यात कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अप आदी समाज माध्यमांवर जातीय तणाव निर्माण होईल, अशा गोष्टी प्रसारीत करण्यास मनाई करण्यात आली आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारीत झाल्यास त्याला ॲडमिन जबाबदार असतील. चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणे, 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, शस्त्र, लाठी-काठी बाळगण्यासही मनाई असणार आहे. जातीय तणाव निर्माण होईल, अशा मजुकराचे फ्लेक्स लावणे व घोषणा देणे, यास बंदी असणार आहे, असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी पत्रकामध्ये म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बिहार निवडणूका जवळ आल्या की, भाजपला महाराष्ट्र हे एकच राज्य बदनाम करण्यासाठी मिळतं’
- खैरे, तुम्ही संसदेत हवे आहात; लोकसभेसाठी खैरेच उमेदवार, संजय राऊत यांचे संकेत!
- ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतातच’
- …अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; कंगना विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
- दिल्लीत ९० कोटींचे हेरॉईन जप्त, दोन महिलांना अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

