पुणे : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. एका कार्यक्रमात तिने केलेल्या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. यावरून संपूर्ण देशातून तीव्र पडसाद उमटत आहे. यानंतर आता कंगना विरोधात विविध भागात गुन्हा दाखल करण्यात आले. आता पुण्यात देखील तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते व चित्रपट निर्माते निलेश नवलाख यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. कंगना राणावत यांना दिलेला पद्म पुरस्कार परत घ्यावा यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पात्र पाठवण्यात आले आहे. कंगनाने लेखी माफी मागितली तर तिला क्षमा सुद्धा केली जाईल अन्यथा उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती निलेश नवलाखा यांनी दिली आहे.
कंगना नाविका कुमार आणि एका वृत्त वाहिनी यांनी एकत्रितपणे भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(ब) च्या अंतर्गत गुन्हा ठरणारे कृत्य केले आहे. पत्रकार नाविका कुमार यांच्या अनैतिक पत्रकातेविरोधात कारवाई करावी यासाठी न्यूज ब्रॉंडकास्टिंग स्टँडर्डस अथोरीटी यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
याआधी जयपूर महिला कॉग्रेसच्या वतीनं याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजस्थानामधील चार शहरांमध्ये तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयपूरच्या सुखेर, जयपूर, जोधपूर आणि शास्त्रीनगरमध्ये कंगनावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता’
- ‘खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा’
- फडणवीसांचं ‘ते’ कृत्य म्हणजे देशद्रोह, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा- नाना पटोले
- मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे- प्रविण दरेकर
- राज कुंद्रा-शिल्पाच्या अडचणीत वाढ; व्यावसायिकाने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल


