नवी दिल्ली : महाराष्टात आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन राजकारण सुरु असतानाच गुजरात मध्येही ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यामध्ये हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा समावेश आहे. याअगोदरही गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
नवी दिल्लीत अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी मोठी कारवाई केली आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सुमारे ९० कोटींचे हेरॉईन जप्त केली आहे. याप्रकरणी केनिया येथून युगांडाच्या दोन महिला प्रवाश्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १२.९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या अमंली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत अंदाजे ९० कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण १२.९०० किलो क्रिस्टलिन हेरॉईन जप्त करण्यात आली. गेल्या वर्षभरात दिल्ली सीमाशुल्क विभागाने १०० किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केली आहे. २६ हून अधिक तस्कारांना अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- साठ वर्षांत प्रथमच विलीनीकरणाची एसटी कामगारांकडून मागणी- अजित पवार
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा फी मिळणार परत
- गडचिरोलीत पोलिसांची दमदार कामगिरी, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा!
- ‘जय भीम’ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार?; राऊतांचा रोखठोक सवाल
- सरकारची ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरल्याने रुग्णांचे मृत्यू – प्रविण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

