औरंगाबाद : खैरे, तुम्ही महागाई विरोधात अनेक वर्षे संसदेत आवाज उठविलात, यापुढेही महागाईविरोधात आवाज उठविण्यासाठी तुम्ही संसदेत हवे आहात. शिवसेना नेते खा. संजय राऊत बोलत होते. लोकसभेची आगामी निवडणूक २०२४ साली होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे हेच उमेदवार असतील असे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी औरंगाबादेत दिले.
सलग चारवेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा गेल्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव झाला. मात्र पराभवानंतर खचून न जाता खैरे यांनी लगेचच पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली. येत्या निवडणुकीत सेनेचा उमेदवार कोण राहणार याविषयी काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र आता राऊतांच्या वक्तव्यानंतर खैरेंच्या नावाविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. विद्यमान आमदार अंबादास दानवे यांच्यासह इतरही काहीजण उमेदवारीचे दावेदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी आक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरून येत्या लोकसभा निवडणुकीत खैरे हेच उमेदवार राहतील, असे संकेत दिले. व्यासपीठावर उपस्थित खैरे यांना उद्देशून राऊत म्हणाले, खैरे तुम्ही अनेक वर्षे संसदेत महागाईविरोधात आवाज उठविलात. सध्या तुम्ही संसदेत नाहीत. कदाचित महागाई वाढीमागचे हेही एक कारण असू शकते. आपल्याला दिल्लीत जायचे आहे. महागाईविरोधात आवाज उठवायला तुम्ही लोकसभेत हवे आहात, असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपस्थितांमध्ये बराचवेळ याविषयी कुजबुज सुरू होती.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; कंगना विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
- दिल्लीत ९० कोटींचे हेरॉईन जप्त, दोन महिलांना अटक
- ‘जखमी’ कॉनवेने दाखवला ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा ध्यास; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
- हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर- आशिष शेलार
- ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही’, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

