मुंबई : त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना पहायला मिळत आहे. राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक घटना घडल्या आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे. राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा जेव्हा राज्यात शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा दंगली घडतात असा थेट आरोप बोंडे यांनी केला आहे. अनिल बोंडे यांनी ट्विट करुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे. जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात, असा आरोप त्यांनी केला आहे. अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलीस कुठे होते? आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे..
जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अश्या दंगली घडतात.
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) November 13, 2021
दरम्यान, आज पोलिसांनी आंदोलक हिंदूंना अडवले त्यांच्यावर लाठीमार, पाणी फेकले, अश्रूधुराचा वापर केला. परंतु हे मुस्लिम आज सुद्धा खुलेआम देशी कट्टे आणि तलवारी घेऊन फिरत आहेत. परंतु कारवाई फक्त हिंदुवरच का? पोलीस प्रशासन ह्यांच्यावर का कारवाई करीत नाही, त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; कंगना विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
- दिल्लीत ९० कोटींचे हेरॉईन जप्त, दोन महिलांना अटक
- ‘जखमी’ कॉनवेने दाखवला ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा ध्यास; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
- हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर- आशिष शेलार
- ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही’, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

