Share

फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड नाही तर सगळ्यांसमोर चर्चा झाली; सामंतांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकतेच कोकणच्या दौऱ्यावर गेले होते त्या ठिकाणी त्यांनी जाऊन वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. थेट नुकसान झालेल्या लोकांशी जाऊन चर्चा केल्याने फडणवीस यांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. यातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत नुकतीच गुप्त भेट घेतली असल्याचे वृत्त समोर आल्याने आता पुन्हा फडणवीस यांचा हा दौरा चर्चेत आला आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे असून देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे.फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात झालेली बैठक पाहता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कोणतीही कोणतीही गुप्त बैठक झाली नसल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट गुप्त नव्हती.  200 लोकांसमोर गुप्तभेट होत नसते. फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड नाही तर सगळ्यांसमोर चर्चा झाली असून ऑपरेशन लोटस होणार नाही, महाविकास आघाडी भक्कम आहे असे ते म्हणाले आहेत.दरम्यान,ज्यांना कोकणाने नाकारलं ते या बैठकीबाबत बोलत असल्याचं म्हणत सामंत यांनी राणेंवर तोफ डागली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!