Share

संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात गुप्त बैठक, प्रविण दरेकर म्हणाले…

Published On: 

मुंबई : आज शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची बातमी समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढील आठवड्यात होणार आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे कधीही पडणार असल्याचे दावे भाजपाच्या नेत्यांकडून केले जात आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, ‘भाजप कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, शिवसेनेने हात पुढे केला तरी आम्ही विरोधातच राहणार’ असे त्यांनी स्पष्ट केले तसेच दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारण गुप्त भेटीगाठी वाढल्या आहेत. आधी संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेट झाली होती. मग त्यानंतर संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. तिथून ते लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. यानंतर मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!