मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन आहे. परंतु कॉंग्रेस मात्र सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. तर शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होती कि काय ? असे प्रश्न राजकीय वर्तुळात रंगू लागले होते.
महाराष्ट्रातील अशा सर्व भीषण राजकीय परिस्थितीत आज शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची बातमी समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढील आठवड्यात होणार आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे कधीही पडणार असल्याचे दावे भाजपाच्या नेत्यांकडून केले जात आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारण गुप्त भेटीगाठी वाढल्या आहेत. आधी संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेट झाली होती.
मग त्यानंतर संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. तिथून ते लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. यानंतर मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका


