हिंगोली: राज्यात आता अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम आता काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत. मात्र कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाहीये त्यामुळे नागरिकांनी कुठलीही घाई न करता काळजीपूर्वकच बाहेरचे व्यवहार करावेत. मारठवड्यातील हिंगोली एकमेव असा जिल्हा राहिला आहे जिथे कोरोनाचे प्रमाण अधिक असून अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर ओसरला नाहीये.
हिंगोलीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असून दुसऱ्या लाटेचे संकट अद्याप कायम आहे. आरोग्याचे नियम न पाळता नागरिक गर्दी करत असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा देऊन निर्बंध शिथिल करून घाईघाईने व्यवहार खुले करू नका,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी गुरुवारी ते दूरचित्र प्रणालीद्वारे बैठकीत बोलत होते.
या ऑनलाइन बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचीदेखील उपस्थिती होती. ‘डेल्टा प्लस’ या उत्परिवर्तित विषाणूचादेखील धोका आहे. संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश ठाकरे यांनी दिले. बैठकीच्या प्रारंभी राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे, मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंच्या ‘बीड पॅटर्न’वर आमदार सुरेश धसांची टीका, म्हणाले… हा तर ‘उलटा पॅटर्न’
- ‘माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणीच असू शकत नाही’
- 38 वर्षे विश्वविजयाची! वेस्ट इंडीजला नमवून आजच पटकावला होता पहिला वर्ल्डकप
- कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह तंत्रज्ञानाचे धडे
- कॅप्टन कुल ‘माही’ शिमल्यात लुटतोय थंड हवेचा आनंद : पहा फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

