Share

‘माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणीच असू शकत नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या धडाकेबाज वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सध्या कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ या सिनेमामुळे तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या सिनेमात अभिनयासोबत कंगना सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. मात्र यावेळी ‘इमर्जन्सी’ सिनेमाचं दिग्दर्शन तिच्याहून उत्तमरित्या कुणीही करू शकतं नाही असे तिचे म्हणणे आहे.

kangara-post

या सिनेमाबद्दल कंगना म्हणाली की, ‘पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसल्याचा आनंद आहे. ‘इमर्जन्सी’ या सिनेमावर एक वर्ष काम केल्यानंतर शेवटी माझ्या हे लक्षात आले की या सिनेमासाठी माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणीच असू शकत नाही. मी लेखक रितेश शाह यांच्यासोबत काम करत आहे. हा सिनेमा तयार करण्यासाठी मला एखाद्या अ‍ॅक्टिंग प्रोजेक्टकडे पाठ फिरवावी लागली तरी ते मला मान्य आहे. मी खूपच जास्त उत्साही आहे. हा खूप सुंदर प्रवास असेल. एका वेगळ्यांच भूमिकेत माझी भरारी आहे.’

‘इमर्जन्सी’ या सिनेमामध्ये कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिकेत दिसणार असून यासाठी ती खूप मेहनत घेत असल्याचेही दिसत आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे.

https://www.instagram.com/p/CQdZrAjB-bT/?utm_source=ig_web_copy_link

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा बहुप्रतिक्षित ‘थलाइवी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने कंगनाचा हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. थलाइवी व्यतिरिक्त कंगनाच्या तेजस, धाकड या चित्रपटात देखील कंगना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!