🕒 1 min read
शिमला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्थगिती नंतर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. धोनी आयपीएल स्थगिती नंतर त्याच्या रांचीतील फार्म हाऊसवर वेळ घालवत होता. धोनीची पत्नी साक्षी धोनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर माहीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धोनीबद्दल अपडेट देताना दिसते. आता धोनी रांचीत नसून शिमल्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

शिमल्यातील धोनीचे काही फोटो समोर आले आहेत. पावसाच्या या मौसममध्ये धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शिमल्याला गेला होता. शिमल्यात धोनी थंडीचा आनंद घेताना दिसत आहे.

शिमल्यातील धोनीचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटो मध्ये धोनीचा नेहमीपेक्षा वेगळा लुक दिसत आहे. धोनीच्या या फोटोला चाहत्यांकडून बरीच पसंती देखील मिळत आहे.

धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो आयपीएल खेळत होता. कोविडचं प्रमाण वाढल्यामुळे ही स्पर्धा अर्ध्यातच रद्द करण्यात आली तेव्हा धोनीची टीम गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी होती. ही स्पर्धा आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…आम्ही एकत्र पुढे जाऊ’ ; पराभवानंतर कोहलीचे भावनात्मक ट्विट
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
- ‘पुण्यातले गरीब झोपडीधारक सेलिब्रिटी नाहीत म्हणून भाजपवाले गप्प?’
- भारतीय स्वातंत्र्याच्या १८५७ च्या उठावात ‘औरंगाबाद’चे मोलाचे योगदान : डॉ. रमजान शेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
