Share

कोरोनाची दुसरी लाट जास्त खतरनाक, २५ लाखांहून अधिक लोक कोरोना संक्रमित होण्याची शक्यता

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळतो आहे. काल (२६ मार्च ) राज्यात कोरोनाचे ३६ हजार ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. कधीकाळी ३६ हजार ही संख्या अख्ख्या देशभरातील नव्या कोरोनाग्रस्तांची असायची. मात्र आता ती एकट्या महाराष्ट्रात नोंदवली जाऊ लागली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.

दरम्यान, ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचे सांगितले जात आहे. यातच भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च पॅनेलने भारतातील कोरोनाची दुसरी लाट खूप खतरनाक असण्याची भीती व्यक्त केली आहे. स्टेट बँकेच्या पॅनेलने या दुसऱ्या लाटेत २५ लाखांहून अधिक लोक कोरोना संक्रमित होण्याची शक्यता वर्तविली आहे. ही लाट १५ फेब्रुवारीपासून सुरु झाली असून मेपर्यंत सुरु राहिल असेही या पॅनेलने अहवालात म्हटले आहे.

एसबीआयच्या या अहवालात म्हटले आहे की, कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. २३ मार्चपर्यंतचा ट्रेंड पाहता मे पर्यंत जवळपास २५ लाख लोक कोरोनाने संक्रमित होऊ शकतात. दुसरीकडे कोरोना दिवसेंदिवस नवीन रेकॉर्ड बनवत आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे ५९११८ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २५७ मृत्यू झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!