🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मोदींच्या या दौऱ्याचा कारण देखील खास आहे. बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे.
बांग्लादेशची राजधानी ढाका येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. ‘बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते,’ असे उद्गार यावेळी मोदींनी काढले आहेत.
यावरून आता भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झालीय. यामध्ये कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी बांग्लादेशलाही फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत, असं थरूर म्हणाले आहेत.
International education: our PM is giving Bangladesh a taste of Indian “fake news”. The absurdity is that everyone knows who liberated Bangladesh. https://t.co/ijjDRbszVd
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 26, 2021
‘आंतरराष्ट्रीय शिक्षणः आमचे पंतप्रधान बांगलादेशला भारतीय “बनावट बातमी” चा आस्वाद देत आहेत. हास्यास्पदपणा म्हणजे बांगलादेशला कोणी मुक्त केले हे सर्वांनाच ठाऊक आहे.’ अशी टीका थरूर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
