Share

लॉकडाऊनचे नियम मोडणारे शहरातील तीन पेट्रोल पंप सील

Published On: 

औरंगाबाद : अंशतः लॉकडाऊन अंतर्गत नियम मोडणाऱ्या शहरातील तीन पेट्रोलपंप मंगळवारी जिल्हा प्रशासनाने सील केले आहेत. दरम्यान, ही कारवाई बुधवारी देखील करण्यात आली.

कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे.  या दृष्टीने पेट्रोलपंपांनादेखील रात्री केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच पेट्रोल देण्यासपरवानगी दिली आहे. मात्र काही पेट्रोल पंपांकडून येणाऱ्या सर्वांना पेट्रोल दिले जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती.यामुळे एक पथक गठीत करून रात्रीच्या वेळी शहरातील पेट्रोल पंपांची पाहणी करण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवारी २३ रोजी हर्सूल टी पॉईंट,  बाबा चौक व सेव्हन हिल येथील पेट्रोल पंपांवर अशा रितीने पेट्रोल दिले जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. यामुळे य तिन्ही पेट्रोल पंपांना सिल करण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेतदेखील या पथकाने शहरातील पेट्रोल पंपांची पाहणी केली आहे. पथकात धान्य वितरण अधिकारी आर. के. मेंडके, पुरवठा निरिक्षक अशोक दराडे, पुरवठा निरिक्षक प्रदीप राठोड, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुरेश राउतमारे, वाहन चालक व्हि. के. धारकर यांचाही समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!