औरंगाबाद : पालक, शाळा यांच्या तक्रारी वाढत असल्याने त्यावर निवारण करण्यासाठी मंगळवारी (दि.२९) विभागीय शिक्षण मंडळात तक्रात निवारण समितीच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी शाळा आणि पालक आपल्या मतांवर ठाम राहून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपण करत आपल्या तक्रारी मांडल्या.
कोरोना काळात शाळा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान तर झाले मात्र याशिवाय काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण दिले मात्र त्यात काही पालकांनी फी भरली नाही तर त्यामुळे काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले. अशा असंख्य तक्रारी येत असल्याने काल बैठक घेऊन तक्रार निवारण करण्यात आले. त्यात शाळा ट्युशन फिस वगळता ज्या सुविधा देत नाही ते देखील शुल्क आकारत आहेत. तसेच शाळा टीसी देत नाहीत, ऑनलाईन लिंकही सुरू करण्यास तयार नाहीत.
याशिवाय शाळांकडून घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कवाढीविरोधात पालकांनी अनेकदा शाळांसमोर निर्दशने केली होती. वाद वाढल्याने विद्यार्थी, पालक, शाळा आणि संस्थांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी बैठक घेऊन निवारण केले. यावेळी पालक आणि शाळांनी आप-आपले मत मांडले. यावेळी शाळेकडून आकारण्यात येणारी फी, शाळा, तासिका, गणवेश, इतर सुविधांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सुधाकर तेलंग, शिक्षण उपसंचालक विभागातील सहाय्यक सचिव एम.के. देशमुख, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे सह आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘१०० कोटींची खंडणी जमा करण्यापूर्वी केंद्राला विचारले होते काय?’
- ‘एक देश-एक रेशन कार्ड’ ३१ जुलैपर्यंत लागू करा; सुप्रीम कोर्टाचा राज्यांना आदेश
- ‘आघाडीत मोठे वाद आणि संशय; शिवसेनेनं भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे’
- चित्रा वाघ यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यामागे भाजपचा नेमका काय आहे उद्देश ?
- दिडशे रुपयांच्या निधीसाठी पालकांच्या खिशाला दिड हजारांचा भुर्दंड!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

