🕒 1 min read
पुणे: कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी म्हटले आहे.
अजून आठ दिवस तरी कोरोनाची आकडेवारी खाली येणार नाही. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या निर्णयानंतर शहरातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणार. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची रिस्क नको म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार !
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
जलतरण तलाव सुरु !
पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
दरम्यान शाळा, कॉलेज जरी बंद असले तरी पुण्यातील जलतरण तलाव आणि पर्यटन स्थळे सुरु राहणार आहेत. लसीचे दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे. तसेच पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रकही लवाकरच जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिंहगड, भीमा शंकर या पर्यटनस्थळाजवळील दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच लेण्याद्री आणि अष्ट विनायकालासुद्धा भाविकांना परवानगी देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र गर्दी झालयास निर्बंध लावणार असल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सत्तार हे सत्तेच्या मागे धावणारे नेते; आज इथे तर उद्या तिथे, डॉ. भागवत कराडांची सणसणीत टिका!
- भाजप मंत्र्याचे गजब कृत्य; बंद खोलीत अधिकाऱ्यांना चोपले, एकाचा हाथ तुटला
- “डिसले गुरुजींना अमेरिकेत पीएच.डी.पासून रोखले जातेय, कारवाई व्हावी अन्यथा…”, रुपाली पाटलांचा इशारा
- छाबय्या विहंग गार्डनवर लावलेल्या दंड माफी प्रकरणी चंद्रकांत पाटलांनी घेतली राज्यपालांची भेट
- कृषिपंप वीजजोडणीत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
