Share

“डिसले गुरुजींना अमेरिकेत पीएच.डी.पासून रोखले जातेय, कारवाई व्हावी अन्यथा…”, रुपाली पाटलांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : जिल्ह्यातील परतेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते रणजित डिसले यांना अमेरिकेत पीएच. डी. करण्यासाठी जाण्यापासून रोखले जात असल्याचा गंभीर आरोप डिसले गुरुजी यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केली आहे.

याबाबत रुपाली पाटील ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या, ‘फुलब्राईट स्कॉलरशिप डिसले गुरुजींच्या हातातून जाणार का? यासाठी अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप गुरुजींनी केली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ताई तत्काळ दखल घ्यावी. जो दोषी असेल त्यावर कारवाई व्हावी अन्यथा …’, असा इशराच रुपाली पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, डिसले गुरुजी यांना पीएच.डी. साठीची रजा शिक्षणाधिकाऱ्यांनी नाकारल्याचे समोर आले आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ‘संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी काय केले? मागील तीन वर्षात त्यांनी शाळेसाठी काय केले? याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्याला सांगितलं आहे. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब अभिमानास्पद आहे; पण त्यांच्या या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला, हे तपासावे लागणार आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आम्हाला उपयोग हवा आहे. त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणारे नाही’ असं शिक्षणाधिकारी म्हणाले.

याबाबत डिसले गुरुजी म्हणाले, ‘मला अमेरिकन सरकारकडून शिक्षकांसाठी दिली जाणारी फुल प्रेस स्कॉलरशिप मिळाली आहे याचा मला आनंद आहे. यासाठी मला २०२२ च्या ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत अमेरिकेत जाऊन पिस इन एज्यूकेशन या विषयावर अधिक सखोल संशोधन करण्याची संधी मिळत आहे. त्यासाठीच मी प्रशासनाकडे अध्ययन रजेचा अर्ज केला होता. मला अपेक्षित होतं की त्या अर्जावर मला काहीतरी निर्णय मिळेल. त्यासाठी मी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांचे निकष आहेत, त्यांच्या निर्णयानंतरच मला याबाबत अधिक माहिती सांगता येईल. माझ्यापर्यंत अद्याप कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी कुठलेही लेखी आदेश मिळालेले नाहीत. ते प्राप्त झाल्यानंतर मी त्याबाबत जास्त बोलू शकेल’,अशी प्रतिक्रिया डिसले गुरुजी यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!