औरंगाबाद : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेकांनी डिजीटल पेंमेटचा पर्याय निवडला आहे. डिजीटल पेमेंट साठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यात आणखी एक पर्याय म्हणजे क्यूआर कोड. जवळपास सगळीकडे आता क्यूआर कोडद्वारे बील देण्याचा पर्याय आहे. बरेच जण क्यूआर कोड स्कॅन करतात आणि पैसे देतात. मात्र क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.
औरंगाबाद येथील बाळू लक्ष्मण बोडखे यांनी ओएलएक्स या ऑनलाइन अॅप वर शिलाई मशीन विक्रीची जाहिरात टाकली होती. बाळू बोडखे हे औरंगाबाद येथील स्कोडा ऑटो कंपनीत काम करतात. ही जाहिरात पाहून मुंबईतील संगीता गुप्ता या महिलेने फोन करुन मशीन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर बोडखे व गुप्ता यांच्यात १६ हजार रुपयांत शिलाई मशिनचा व्यवहार ठरला.
व्यवहार ठरल्यानंतर संगीता गुप्ता यांनी बाळू बोडखे यांना व्हॉट्सअॅपवर क्यूआर कोड पाठवला. हा क्यूआर कोड स्कॅन करण्यास संगीता गुप्ता यांनी बोडखे यांना सांगितले. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे बोडखे यांनी क्यूआर कोड स्कॅन करताच बोडखे यांच्या बँक खात्यातील ८० हजार रुपये काढून घेतले. अशा प्रकारे क्यूआर कोड स्कॅन केल्यामुळे बोडखे यांची ८० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली.
महत्वाच्या बातम्या
- ‘बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीचे नाव घेताना डीसीपी बायकोचं नाव घ्यायचं असल्याप्रमाणे लाजत होते’
- सोनपेठ येथील क्रीडा संकुलासाठी सर्वोतोपरी मदत करणार; क्रीडा मंत्र्यांचे आश्वासन
- नोकरदारांसाठी वाईट बातमी: पीएफवरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात घोषणेची शक्यता
- सिंचन व्यवस्थापनाचे कार्यालय नाशिकवरुन औरंगाबादला हलवण्याची आ. बोरनारेंची मागणी
- जालन्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, धमकी आणि बदनामीच्या तीन घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
