मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या आज पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘घोटाळा मुक्त महाराष्ट्र’ असे ट्वीट करत त्यांनी मोठा गौप्यस्फोट करणार असा इशारा दिला आहे.
दरम्यान किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर साखर कारखान्यावरून आरोप केले आहेत. यावरच ते आज अजून एक मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. अजितदादांनी त्यांच्या कंपन्या आणि त्यातील गुंतवणुकीवर चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या बहिणींच्या आर्थिक व्यवहारावरही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. बिल्डरबरोबरांच्या संबंधावर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही. स्पार्कलिंक बाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. जरंडेश्वर मिल प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्रीतून 2009 मध्ये 50 कोटी मिळाले होते. या सर्वांना त्यांनी बगल दिली आहे. गुरु कमोडिला कारखाना कसा दिला. कमोडिटीजला कारखाना चालवण्याचा गंधही नव्हता. त्यांचा संबंधही नव्हता. तरीही त्यांना कारखाना कसा विकला? असा सवाल सोमय्यांनी केला होता.
"घोटाळा मुक्त महाराष्ट्र"
किरीट सोमैया सोबत संवाद
आज शनिवार 23 ऑक्टोबर
३.३० वाजता सुकृतींद्र कला मंदिर हॉल आझाद रोड पारनाका, वसई पश्चिम
८ वाजता बीजेपी कार्यालय, गांधी भवन, नागरदास रोड, अंधेरी पुर्व
@BJP4Maharashtra pic.twitter.com/S0zznldH5K
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 23, 2021
आता आज ते ३.३० वाजता सुकृतींद्र कला मंदिर हॉल आझाद रोड पारनाका, वसई पश्चिम येथील बीजेपी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. "घोटाळा मुक्त महाराष्ट्र" असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, त्या हत्याच!’
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी


