Share

SBI ची खास योजना; दरमहा केवळ २८ रुपये भरून मिळवा ४ लाख रुपये

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांची संख्या देखील खूप मोठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी अनेक फायदे देत असते. जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुम्ही दरमहा फक्त 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला 4 लाख रुपयांचा लाभ होऊ शकतो. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. या दोन योजनांमध्ये फक्त 342 रुपये वार्षिक तुम्हाला जमा करावे लागणार आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PMJJBY- 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला जीवन संरक्षण मिळते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना PMSBY-

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) योजना अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा प्रदान करते. ही केंद्र सरकारची एक योजना असून याद्वारे खातेधारकाला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अशा पद्धतीच्या या योजनेचा नागरिकां ना भविष्यात फायदा होऊ शकतो. तसेच यासाठी तुम्हाला अगदी कमी किंमतीत गुंतवणूक करायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!