🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या गेल्या वर्षभरापासून जगासह देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. गेल्या वर्षी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोणताही योग्य उपचार उपलब्ध नव्हता मात्र यावर्षी कोरोना प्रतिबंधक लस आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान लोकांना सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना संसर्गाची शक्यता जास्त असल्याने स्वतःच्या वाहनातून प्रवास करण्यासाठी कार खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. यामध्ये आता देशातील सर्वात मोठी बँक आपली स्वप्नातील कार घरी आणण्यासाठी एसबीआय बंपर ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही योनो एसबीआय वर टोयोटाची कार बुक केल्यास तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत विनामूल्य अ;ॅक्सेसरीज मिळतील. एसबीआयने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
Ride your dream car with pride!
Book any Toyota Car via YONO SBI and get free accessories upto ₹5000. Applying through YONO gets you a 0.25% concession on the interest rate.#Toyota #DreamCar #CarLoan #YONOSBI #Offers pic.twitter.com/ruDLO1f9Lg
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 10, 2021
एसबीआयने ट्विटनुसार, जेव्हा तुम्ही योनो या एसबीआयच्या अ;ॅप माध्यमातून टोयोटा कार बुक कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या कर्जाच्या व्याजदरावर 0.25 टक्के सूट मिळेल. या ऑफरबद्दल एसबीआयने ट्विटरवर ट्विट केले आहे. यासाठी ग्राहकांना एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन माहिती मिळवता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालना; २२ लाखांचे कांदा बियाणे चोरणारा गजाआड
- ‘गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील’
- सहा वर्षात पहिल्यांदाच धोनीच्या नावावर नकोसा विक्रम
- …अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही, व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकार विरोधात एल्गार
- लस वितरणात कोणतंही राजकारण नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

