🕒 1 min read
ब्रासिलिया : जगभरात करोनाचं थैमान सुरूच आहे. भारत, अमेरिकेसह ब्राझीललाही करोनाचा मोठा फटका बसला असून, करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या देशाचं लक्ष सध्या लसीकडे लागलं होत. मात्र, करोनाची लस घेण्यास ब्राझीलच्या राष्ट्रपतीनी जेअर बोलसोनारो यांनी “आपण करोनाची लस घेणार नाही. तो माझा अधिकार आहे,” अस अजब विधान केल्या नंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
त्यांनतर डिसेंबरमध्ये अमेरिका आणि इग्लंड मध्ये करोना लासिकारणाला सुरुवात झाली. भारतात नववर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसींनाआपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. यानंतर लवकरच भारतात लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोनाची लस पाठवण्याची विनंती केली आहे.
ब्राझील सरकार द्वारा संचालित फियोक्रूझ बायोमेडिकल सेंटरने एस्ट्राजेनेका नामक लसीचे लाखो डोस या महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही, असे सांगितले. ब्राझीलमध्ये तातडीने कोणतीही लस उपलब्ध होण्याची शक्यता धुसर असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताकडून लस मिळण्याबाबत पत्र पाठवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भारतातून येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी, अशी विनंती फ्रियोक्रूझकडून ब्राझील सरकारला करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाने थैमान घातलेल्या देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये अद्याप लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला नाही. लसीकरणाला सुरुवात न झाल्यामुळे सरकारला जनतेतून विरोध होत आहे. यामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताकडे मदत मागितली असून, कोरोना लस शक्य तितक्या लवकर पाठवण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याची माहिती मिळाली आहे.
ब्राझीलच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून एक पत्र पाठवण्यात आले आहे. ‘भारतातील लसीकरण मोहिमेत कोणताही खंड पडू न देता ब्राझीलमधील राष्ट्रीस लसीकरणाचा प्रारंभ करण्यासाठी कोरोना लसीचे २० लाख डोस पाठवण्यात यावेत’, अशी मी विनंती करतो, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँकेसमोर दुचाकी पार्क करताय.. सावधान! गाडी चोरीला जाऊ शकते!
- #भंडारा दुर्घटना : दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- अजित पवार
- #भंडारा दुर्घटनेपासून धडा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करा- आठवले
- #भंडारा दुर्घटना : भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल : टोपे
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

