🕒 1 min read
मुंबई: सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (NCP leaders Rupali Patil Thombre) यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. यानिमित्ताने सर्व स्तरातून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विटच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहत ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवा, अशी मागणी केली आहे.
‘आज सवित्रीमाईचा जन्मदिवस आहे. देशभर महिला शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहेत ही सवित्रीमाईचीच पुण्याई आहे. महिलांच्या आयुष्याचे सोने करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले यांना ‘भारतरत्न’ मिळाला पाहिजे. त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा.’ असे ट्वीट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी महिलासन्मान हा हॅशटॅगही वापरला आहे.
#महिलासन्मान : आज सवित्रीमाईचा जन्मदिवस
देशभर महिला शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहेत ही आपलीच पुण्याई ; महिलांच्या आयुष्याचे सोने करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले यांना "भारतरत्न" मिळाला पाहिजे.त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा pic.twitter.com/hKm1i6Lfwh
— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 3, 2022
दरम्यान या पार्श्वभूमीवरच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनीही ट्विटच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे. ‘महात्मा फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला.इ.स. १८९६ च्या दुष्काळात माणूसकी विसरून एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला. असामान्य जीवन जगणाऱ्या ज्ञानगंगोत्री सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन’, असे भुजबळ ट्विटमध्ये म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल, यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय?
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
