Raj Thackeray |मुंबई : महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी गेले दोन-तीन दिवस झाले अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे. त्याचबरोबर अचानक पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुसकान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना(MNS) पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्याकडे एक मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिंदेंना पत्र (Latter) देखील लिहील असल्याचं समजतं आहे.
राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अवकाळी पावसामुळेपिकं खराब झाल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून या शेकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट(Tweet) केलं आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtra pic.twitter.com/BsjqkGJWTY
— Raj Thackeray (@RajThackeray) October 20, 2022
ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले, “ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा.” याचबरोबर त्यांनी शिंदेंना लिहिलेलं पत्रही शेअर केलं आहे.
राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे की, “या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा.”
महत्वाच्या बातम्या :
- MCA Elections | खेळात राजकारण नाही! मग पैशांसाठी एकत्र आले का?
- Ajit Pawar | अजित पवारांना ‘या’ आजाराचा संसर्ग, पुणे दौरा देखील केला रद्द
- DDLJ | ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या प्रेमकथेला आज झाले 27 वर्ष पूर्ण
- Ambadas Danve | “आम्ही ‘त्या’ गुन्ह्यांना भीक घालत नाही”; अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर हल्ला
- Eknath Shinde | “मी शपथ घेतो की…”, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

