Share

“सावित्री पुलाची दुर्घटना अजूनही ताजीच…”, सुनील तटकरेंनी केली गडकरींकडे ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सावित्री पुलाची दुर्घटना अजूनही ताजी आहे. त्यामुळे अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून सदर पुलांच्या दुरूस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी विनंती सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांना केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ हा रायगड किल्ल्याशी जोडावा जेणेकरून पर्यटनास चालना मिळेल. तसेच रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ६०-७० वर्षांपासूनचे जुने पुल वाहतुकीसाठी वापरात आहेत, ते कधीही कोसळू शकतात अशी त्यांची अवस्था आहे. अशी माहितीही सुनील तटकरे यांनी दिली.

तसेच महाड-इंदापूर भागातही अशा प्रकारचे काम आवश्यक आहे. गतवर्षी सदर भागात पूरामुळे खूप नुकसान झाले होते. त्यामुळे तेथील रस्त्यांची कामेही प्राधान्यक्रमाने करावीत, असे आवाहन त्यांनी केले. सोबतच केरळप्रमाणे कोकणातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे सदर रस्त्याची दरवर्षी दूरवस्था होत असते. त्यामुळे या भागात काँक्रिटचे रस्ते बनवावेत, अशी मागणीही त्यांनी नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील आवश्यक दुरूस्तीचा प्रश्न लोकसभेत मांडला. ते म्हणाले की, मुंबई-गोवा द्रुतगती महामार्गावरील विशेषत: पनवेल ते पळस्पापर्यंतच्या मार्गाचे काम खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती लोकसभेत मांडली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!