Share

‘कृपया गोलपोस्ट बदलू नका’ ; ICC वर संतापले रवी शास्त्री

Published On: 

अहमदाबाद : येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये लॉर्ड्सवर होणार आहे.

दरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आयसीसीवर टीका केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या  क्वालिफिकेशनचे नियम बदलल्याबद्दल शास्त्रींनी आयसीसीवर निशाणा साधला. आयसीसीने वारंवार नियम बदलण्यापासून वाचलं पाहिजे, असं शास्त्री म्हणाले. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताचा 3-1 ने विजय झाला.

याचसोबत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या मॅचमध्ये त्यांचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे जवळपास 2020 मध्ये क्रिकेट खेळलं गेलं नाही, त्यामुळे आयसीसीने स्पर्धा सुरू असतानाच सर्वाधिक अंकाचा मापदंड बदलून सर्वाधिक विजयी टक्केवारी असणारी टीम फायनलला क्वालिफाय होईल, असा नियम केला.

‘कोरोनामुळे मी ऑक्टोबर महिन्यात घरात बसलो आहे. बाकीच्या टीमपेक्षा माझे पॉईंट्स जास्त आहेत. एका आठवड्यानंतर काही नियम बदलले जातात आणि मी पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर जातो. कृपया गोलपोस्ट बदलू नका,’ असा सल्ला शास्त्रींनी आयसीसीला दिला.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!