🕒 1 min read
इंदापूर:- युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर इंदापुरात येऊन टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील संधीसाधू असल्याचा घणाघात तांबेंनी केला आहे.
इंदापूर तालुक्यात स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे नाव आजही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता तसेच नेता आदराने घेतो. पुणे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पुढच्या पिढ्यांत तो विचार राहिला नाही किंबहुना संधीसाधूपणा आला. खरं तर शंकरराव पाटलांचा काँग्रेसी विचार त्यांच्या वारसांनी नाही तर इंदापुरच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जपला, अशी टीका सत्यजीत तांबे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली होती.
सत्यजित तांबेंच्या या टीकेला हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सत्यजीत तांबेंची कुवत सगळ्या राज्याला माहिती आहे. लहान तोंडी मोठा घास त्यांनी घेऊ नये. ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना मान ठेवायला हवा. तसंच दिशाभूल करणारी वक्तव्यं त्यांनी टाळावीत, अशा शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दी एवढंही नाही. तेव्हा टिका टिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती, असा बोचरा वार अंकिता पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- विरोधी पक्षाने फक्त तंबूत बसून निदर्शने करावीत; शेतकरी नेत्यांची टीका
- तृतीयपंथीयांच्या मनाचा मोठेपणा; साईबाबांच्या झोळीत टाकले 11 लाखांचे दान
- रेल्वे मंत्री पीयूष गोयल करणार रेल्वेची ‘नवी वेबसाइट’ लॉन्च
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
