बीड: बीड येथील शेतकरी मेळाव्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या, “संजय राऊत यांनी युतीबाबत केलेल्या विधानावर मी टिप्पणी करू शकणार नाही. पण त्यांच्या भावनेला पक्षातील पक्षाध्यक्ष आणि पक्षातील निर्णय घेणारे इतर नेतेच उत्तर देतील, असं सांगतानाच राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे”, असं सूचक विधान केले आहे.
युतीबाबतचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात मोठं विधान केलं होतं. भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखाद्या भूमिकेवरून शिवसेना माघार घेणार नाही, असं राऊत म्हणाले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं..
पुढे बोलताना, ‘महाराष्ट्रातील विद्यार्थी हे यशवंतरावांचे देणे लागतात. आज राज्यात गुणांची खाण असणाऱ्या नेत्यांची संख्या कमी आहे. भविष्यात दुर्गुणांची खाण असलेले नेतेच महत्त्वाचे वाटतील. युद्ध जिंकणे आणि हारणे हे खरे राजकारण नाही. लोकांची मने जिंकली पाहिजेत. सध्या राजकारणात सर्कस सुरू पाहायला मिळतेय’. ”राज्य करताना सात्विकपणे केलं पाहिजे आणि युद्ध करताना पराक्रमाने” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

