मुंबई : आयपीएल २०२२चा थरार लवकरच सुरू होणार आहे, प्रेक्षकांना पुन्हा एकदा चौकार-षटकार पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक फलंदाजांनी आपल्या चमकदार फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे. यंदाही अनेक दिग्गज फलंदाज या स्पर्धेत आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहेत. विराट कोहली, केएल राहुल, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, इशान किशन आणि लियाम लिव्हिंगस्टोन सारखे सुपरस्टार आयपीएल २०२२मध्ये आपली गुणवत्ता दाखवतील.
आयपीएल ही स्पर्धा जगप्रसिद्ध टी-२० फॉरमॅटमध्ये खेळली जाते, त्यामुळे येथे फलंदाज वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना संघाच्या धावांचा वेग वाढवायचा असतो. या प्रयत्नात अनेक वेळा मोठमोठे विक्रमही केले जातात आणि त्यातील एक विक्रम सर्वात वेगवान अर्धशतकाचा आहे. ही कामगिरी पंजाब किंग्जचा माजी खेळाडू केएल राहुलच्या नावावर आहे, त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केवळ १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी अगदी कमी चेंडूत अर्धशतके झळकावली आहेत, तर काही खेळाडू असे आहेत जे अर्धशतकांसाठी खूप चेंडू खेळले आहेत आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्यांचा समावेश आहे.
जेपी ड्युमिनी
आयपीएलमध्ये सर्वात संथ अर्धशतक करण्याचा विक्रम जेपी ड्युमिनीच्या नावावर आहे. २००९मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना ड्युमिनीच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला होता. मुंबई इंडियन्सकडून खेळताना ड्युमिनीने ५५ चेंडूत आयपीएलमधील सर्वात संथ अर्धशतक झळकावले. ड्युमिनीने या सामन्यात एकूण ५९ धावा केल्या आणि ६३ चेंडूंचा सामना केला.
पार्थिव पटेल
आयपीएल २०१०मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना, पार्थिव पटेलने आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात संथ अर्धशतक झळकावले. पार्थिवने ५३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पार्थिवने या सामन्यात एकूण ५७ धावा केल्या आणि तो चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. मात्र, हा सामना टाय झाला, सुपरओव्हरमध्ये हा सामना पंजाबने जिंकला.
ब्रँडन मॅक्क्युलम आणि रॉबिन उथप्पा
आयपीएलमध्ये तिसरे संथ अर्धशतक झळकावणारे दोन फलंदाज आहेत. ब्रेंडन मॅक्युलम आणि रॉबिन उथप्पा या दोघांनी ५२ चेंडूत अर्धशतकं झळकावली. मॅक्क्युलमने २०१० मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ही खेळी खेळली होती. तर, रॉबिन उथप्पाने २०१२मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळताना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध त्याची संथ अर्धशतकी खेळी खेळली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

