Share

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! सुपरस्टार ‘पुनीत राजकुमार’ची जीवनकथा पाठ्यपुस्तकात शिकवणार

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. कर्नाटक सरकारने पुनीतच्या जीवनावरील एक धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीने पुनीतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पुनीत राजकुमार हा कन्नड सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या दमदार अभिनयाचे आणि चित्रपटांचे असंख्य चाहते देशभरात आहेत. फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे, तर पुनीतची एकूणच सामाजिक क्षेत्रातही प्रतिष्ठित व्यक्ती अशी ओळख होती.

पुनीतच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या काही चाहत्यांनीही आत्महत्या केली होती.इतकी त्याची लोकप्रियता अफाट होती. यामुळेच पुनीत राजकुमारच्या लोकप्रियतेचा विचार करत, त्याचा अपेक्षित सन्मान करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने त्याच्या आयुष्यातील घटनेचा किंवा गोष्टीचा राज्याच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी यासंबंधीचे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष  एन.आर. रमेश यांनी राज्याचे शिक्षणमंत्र्याना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!